Sant Gajanan Shegaon

Das Ganu virachit – Gajanan Vijay Granth

Gajanan Strotra And Gajanan Bavanni

 

Here you will find Gajanan Vijay Grant in mp3 format and can do your parayan. Besides Gajanan Bavanni and Gajanan Strotra also given here.

जय गजानन….कृपया एकवेळा वाचावे किंवा आईकवे …

महाराजांनी अध्यायानुसार दिलेला संदेश

  • अध्याय पहिला

अन्न भक्षिले देहानीं । म्हणून त्या पाहिजे पाणी । हा व्यवहार चतुरांनी । अवश्य पाहिजे जाणिला ।।१३०।।

  • अध्याय दुसरा

हें नाणें तुमचें व्यवहारी । मला न त्याची जरुरी । भावभक्ति नाण्यावरी । संतुष्ट मी रहातसे ।।५०।।

  • आध्याय ३ रा

जें जें जयानें सांगावे । तें तें त्यानें आचरावें। शब्दच्छलासीं न करावें । साधकाने केव्हांही ।।६५।।

  • अध्याय ४ था

                      जा वेळ करूं नको। उगीच सबबी सांगू नको । गुरुपाशीं बोलू नको। खोटे वेड्या यत्किंचित् ।।८३।।

                      अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरून । त्या कर्माची तुजलागून । फळें भोगणें भाग असे ।।११७।।
                      ती फळें भोगल्याविना। सुटका तुझी होईना । दे हा टाकून हट्टीपणा । विवेक कांहीं करी मनी।।११८।।

                      असो एक्या समयीं भली । समर्थांसी इच्छा झाली । ती त्यांनी निवेदिली ।। आपल्या शिष्यवर्गातें ।।१४३।।
                      वैदिक ब्राम्हण बोलवा । मंत्र जागर येथें करवा । वेदश्रवणे देवदेवा ।। आनंद होतो अतिशय ।।१४४।।

  • अध्याय ५ वा

                    पुण्य पाणी पाजण्याचें । आहे बापा थोर साचें। पाण्यावाचून प्राणाचे । रक्षण होणे अशक्य ।।९७।।

  • अध्याय ६ वा

                     संतत्व नाहीं मठांत। संतत्व नाही विद्वत्तेत। संतत्व नाही कवित्वांत । तेथें स्वानुभव पाहिजे ।।८४।।

                     कर्म मार्ग सोडूं नको । विधी निरर्थक मानूं नको । मात्र त्यांत होऊं नको । लिप्त बाळा केव्हांही ।।११९।।
                     आचरून कर्म फल । टाकितां भेटतो घननीळ । त्याच्या अंगीं न लागे मळ । या कर्माचा केव्हांही।।१२०।।

  • अध्याय ७ वा
             पहिली संपत्ति शरीर । दुसरें तें घरदार । तिसरीचा तो प्रकार । आहे धनमानाचा ।।५७।।
  • अध्याय ८ वा

                     ज्यांनी राख लावावी । त्यांनी उपाधी दूर ठेवावी । अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ।।१४७।।
                     नुसते शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात । तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ।।१४८।।

  • अध्याय ९ वा

                    ब्राह्मणाचें भाषण । कदा नसावे अप्रमाण । या तत्त्वालागून । न जाणती चांडाळ ते ।।७३।।
                    व्दिजे निजधर्म सोडिला । आचार विचार सांडिला । ह्यामुळें श्रेष्ठत्वाला । ते मुकलें सांप्रत।।७४।।
                   बोलण्यात पाहिजे मेळ । चित्त असावे निर्मळ। तरीच तो घननीळ । कृपा करितो भास्करा ।।७६।।

  • अध्याय १० वा

                  महाराज वदले अखेर। गणेश आप्पाचा धरून कर । तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ।।२९।।
                  तुझ्या सदनीं वाटतें यावें । कांही वेळ बसावें । अरे चित्ती असेल ते बोलावे । भीड न धरितां कवणाची।।३०।।

  • अध्याय ११ वा

                 गजाननांचे समोर। आणिला पाटील भास्कर।बाळाभाऊनें समाचार ।अवघा समर्थांसी श्रुत केला।।२०।।
                 तो अवघा ऐकून । महाराज वदले हसून । हत्या, वैर आणि ऋण । हे कोणासी चुकेना।।२१।।

                महाराज म्हणती त्याकारण । हेंच तुझे अज्ञान । अरे वेड्या जन्ममरण । हीच मुळीं भ्रांति असे ।।३५।।
                जन्मे न कोणी, मरे न कोणी । हे जाणावया लागुनी । परमार्थाचा उपाय जाणी । शास्त्रकारें कथन केला ।।३६।।

               संचित – प्रारब्ध – क्रियमाण । हें भोगल्यावाचून । या बध्द जीवा लागून । सुटका होणें मुळींच नसे।।३८।।
                पूर्वजन्मीं जे करावें । तें या जन्मी भोगावे । आणि ते भोगण्यासाठीं यावें। जन्मा हा सिद्धान्त असे ।।३९।।

  • अध्याय १२ वा

               राजे कित्येक भूमीवरी । आजवरी झाले तरी । जागा कशाची सरकारी । इचा मालक पांडुरंग ।।१४०।।

  • अध्याय १३ वा

                एका रेतीच्या गाडीवरी । समर्थांची बसली स्वारी । तो गाडीवान झाला दुरी । महार होता म्हणून ।।३५।।
                तयीं महाराज वदले तयास । कां रे खालीं उतरलास ? । आम्हां परमहंसास । विटाळाची बाधा नसे ।।३६।।

  • अध्याय १४ वा

               अरे आत्महत्या करु नये। हताश कदापि होऊं नये। प्रयत्न करण्या चुकूं नये। साध्य वस्तु साधण्यास।।३८।।
               आतां जरी दिलास प्राण । प्रपंचाशीं त्रासून । तरी येशील घेऊन । जन्म पुन्हां ते भोगावया ।।३९।।
               नको जावुं हिमालया । गंगेमाजीं प्राण द्याया । परत आपुल्या घरीं जाया । वेळ वेडया करूं नको ।।४०।।

              आतां तरी येथून । खर्च करावा सांभाळून । उगे न करी उधळेपण । त्यांत नसे सार कांहीं ।।५७।।
              जन सुखाचे सोबती । निर्वाणीचा श्रीपती । त्याची सदैव करी भक्ति । तो न उपेक्षी कदा तुला ।।५८।।

  • अध्याय १५ वा

                सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना । कंसाचा तो मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल।।८७।।

                जेंव्हां स्वार्थाचा संबंध नसतो । तेव्हां न्याय आठवतो । हा जगाचा सिद्धांत तो। होईल खोटा कोठूनी ।।९४।।

                अगणित करावें पुण्य । तेंव्हाच होतें येथें जनन । या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असे ।।१३०।।
                ते योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला । योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ।।१३१।।

  • अध्याय १६ वा

                   मग ते एकमेकांचे । काय गुरू होती साचे । नादी दंभाचाराचें । त्वां पुंडलीका पडूं नये ।।२७।।

  • अध्याय १७ वा

                   फार आग्रह करशील । तरी फजीत पावशील । याचा विचार करी खोल । मी न बोललो कांहींतरी ।।१९।।
                   दोरीसी दिधल्या फार ताण । मी मध्येंच तुटतसे जाण । मी न हलणार येथून । तूं या फंदात पडूं नको ।।२०।।

  • अध्याय १८ वा

                  लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती । तेथें एक रक्षण करिती ।। संत अथवा देव हो ।।१६५।।

  • अध्याय १९ वा

                  मलीनता मनाठायीं । अंशेही राहिल्या पाही । त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा रे ! ।।९१।।
                  मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून । ऐशीं अंगे असती जाण । या भक्तिमार्गाला ।।९३।।
                  आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक । शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ।।१०४।।
                  ज्याची निष्ठा बसेल । वा ! जो माझा असेल । त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरूर मला ।।१२७।।

                 मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तीत अंतर करूं नका । कदा मजलागी विसरूं नका । मी आहे येथेंच ।।३११।।

  • अध्याय २० वा

                  यामध्यें न कांही सार । धन भूचें भूमिवर । येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ।।२५।।
                  अभिषेक ब्राम्हण भोजन । हे पारमार्थिक आहे पुण्य । त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ।।२६।।

                   निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव । उपास्यापदीं भाव । उपासकें ठेवावा ।।१७८।।

  • अध्याय २१ वा

                 व्देषी मन असूं नये । सन्नीतीला सोडूं नये । राजाविरुध्द जावुं नये । उगीच भलत्या कामांत ।।६६।।
                  साधु कोण संत कोण ? । हें पाहावें शोधून । दांभिकांच्या नादीं जाण । कदापिही लागूं नये ।।६७।।

                आय पाहून खर्च करी । दंभाचार कधीं न वरी । साधुसंत येतां घरीं । विन्मुखे त्याला लावू नये ।।६९।।
                अपमान खऱ्या संतांचा । झाल्या कोप ईश्वराचा । होतसे बापा साचा । संत चरणीं प्रेमा धरीं ।।७०।।

              सन्नीतीला सोडूं नका । धर्मवासना टाकूं नका । शत्रु ना माना एकमेकां । तरीच शक्ति वाढेल ।।२१४।।

 

19 thoughts on “Sant Gajanan Vijay Granth – Audio”

    1. गिरीश देशपांडे

      गण गण गणात बोते 🙏🙏 जय गजानन श्री गजानन🙏🙏 आज महाराजांचा प्रकटदिन 🙏 सर्व भक्तांवर महाराजांची कृपा असावी हीच सदिच्छा🙏🙏💐💐
      दिनांक 23/02/22

  1. Shyam Bhaskarrao Dadke

    धन्यवाद.
    श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🚩🚩.

  2. Shyam Bhaskarrao Dadke

    Thanks lot for the Gajanan Vijay Granth Audio Adhyay.
    Shree Gajanan Maharaj ki Jai.
    गण गण गणात बोते 🙏🙏🚩🚩

    1. अश्विनी उमेश मोहिते

      श्री गजानन महाराज की जय 🙏🙏🙏

  3. Bookmark ( कुठपर्यंत ऐकलं आहे त्याची खूण ) ठेवण्याची सोय असावी ही विनंती .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *