Ya Granthi Jyacha Bhav

Ya Granthi Jyacha Bhav Tayasi Pave Swamirao

या ग्रंथी ज्याचा भाव त्यासी पावे स्वामीराव

 गजानन अनुभव

जय गजानन! असं म्हणतात की भक्ताचे बोबडे बोल आणि बालीश मागणी याकडे देखील सद्गुरू कृपादृष्टीने पाहतात. मी पुण्यात असते. गेल्या अनेक वर्षांपासून मी शालेय विद्यार्थ्यांसाठी क्लासेस चालविते. सीमा तेरेदेसाई हे माझं नाव! भक्त सद्गुरूंसमोर काय मागणी करतील याचा नेम नाही. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. मी एकदा शेगांवला महाराजांसमोर उभी होते. आज माझी आर्थिक स्थिती सुदृढ आहेपण तो काळ थोडा वेगळा होता. क्लासेस म्हणावे असे चालत नव्हते. सहज माझ्या तोंडून निघाले. काय महाराजचालू द्या की माझे क्लासेसत्यात काय उत्पन्नाच्या दहा टक्के देईन की मी दान येथे! असं सहज म्हणून मी परतले. तुम्हाला सांगते! अहो असे क्लासेस चालू लागलेतमग मीही दान देणं सुरू केलं. काही वर्ष झालीतअन् एके वर्षी मी मोजणी प्रमाणे दान न करता कमी राशी दिली. योगायोग का कायदुसरे वर्षी क्लासेसची संख्या बरीच रोडावली. मग मी आत्मचिंतन केलं. हे वागणं योग्य नव्हे! मोजणी पेक्षा जास्त राशी आपण दान करायला हवी असा बोध मनाने दिला.

अध्यात्मिक विषयांवर वाचन करीत असताना असं लक्षात येतं कीबालीश मागणं सद्गुरू पूर्ण करतातपण भक्तानं त्यापासून दूर असावं. सद्गुरूंना विषयाची मागणी करू नये. पण त्याचवेळी असंही म्हटल्या जातं कीसुरूवातीला भक्त सद्गुरूंशी अशा गोष्टींमुळे जोडल्या गेला तरी जसजशी त्याची भक्ती योग्य दिशेने समोर जाईल तसा तो भक्त केवळ भक्तीत रममाण होईल. असो! पुण्यात पूर्वी रमणबागेत गजानन महाराजांची पालखी यायचीतिथून आम्हाला गजानन महाराजांविषयी माहिती झाली. जीवनात सुरूवातीला काही हलके फुलके अनुभव आलेत. त्यातून श्रध्दा दृढ झाली.

आता गजानन विजयचं वाचन नियमित सुरू झालं होतं,  अन् एका गंभीर प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ आली. झालं असं की मला दोन मुलीमोठी स्मितालहान शमा. स्मिताचं लग्न १९९६ साली झालं तर शमाचं १९९९ साली.  स्मिताला अपत्य प्राप्ती झाली पण शमाच्या संसार वेलीवर  लग्नाला तीन वर्षे पूर्ण झालीत तरी वेल बहरण्याचं काही लक्षण दिसेना. अर्थात अनेक ठिकाणी पाच पाच वर्षांनंतर मूल जन्माला येतं. त्यामुळे विचार करण्यासारखी स्थिती असली तरी तो गंभीर प्रश्न नव्हता. शिवाय योग्य वयातच लग्न झाल्याने शमाचं वय फक्त चोवीस वर्षांचच होतं. त्यामुळे वयाच्याही दृष्टीने बिकट स्थिती म्हणावी असं काही खरं तर नव्हतं! पण बरेचदा संबंधित माणसं धीरानं वागली नाहीत की असलेली स्थिती आपण अधिकच गंभीर झाल्याचं बघतो. शमाच्या बाबतीत तेच झालं! तिच्या घरचे लोक ‘ त्या ‘ संदर्भात विचित्र विचार करून त्याचा त्रास शमाला होऊ लागला. घरी दीर नेत्र रोग तज्ञडोळ्याचा डाॅक्टर ,पण स्त्री रोग तज्ञाच्या भूमिकेतून त्यानं  टेस्ट ट्यूब बेबी पध्दतीचा मार्ग जाहीर केला. शत्रूवर देखील वेळ येऊ नये अशा टेस्ट ट्यूब बेबी पध्दतीत यातना असतात. शारीरिक मानसिक वेदना असतात. त्यात यशस्वीतेचं प्रमाण चाळीस टक्के इतकं कमी असतं. म्हणजे शंभरात साठ स्त्रियांना केवळ यातना होऊन हाती काहीच येत नाही असं विदारक दृश्य असतं. शमाचं सासर मुंबईलाआम्हाला तिच्या घरी बोलावून हा निर्णय सांगण्यात आला. आम्ही नाही म्हणत असतानाही ऑपेरा हाऊस मुंबई येथील टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला शमाला नेण्यात आलं. शेवटी तेथील डाॅक्टरांनी देखील समजावून सांगितलं. वय वर्षे चोवीस लक्षात घेता आताच असं काही पाऊल उचलणं योग्य होणार नाही. थोडी वाट पहा. यानंतर शमाच्या आई बाबांना म्हणजे आम्हाला सांगण्यात आलंठीक आहे आम्ही सव्वा वर्ष जास्तीत जास्त वाट पाहू यात काही घडून आलं तर ठीक नाहीतर  आम्हाला ‘वेगळा ‘ विचार करावा लागेल. अत्यंत विमनस्क परिस्थितीतएका प्रचंड दडपणाखाली आम्ही पुण्याला परतलो. माझ्या समोर सर्वत्र अंधार होता.  एकच मार्ग होता ‘ गजानन महाराज ‘मागे मनाच्या बालीश अवस्थेत मी गजानन महाराजांना बोलले होते. आता मनाची घालमेल होऊन मी त्यांच्या चरणावर डोकं टेकलं. माझं गजानन विजयचं पारायण संकल्पासह सुरू झालं. पुण्यात गजानन महाराजांचे जे काही मोजके मठ आहेत त्यातील एक म्हणजे ‘ दवे सदन ‘ तिथे माझं वारंवार जाणं होऊ लागलं. एक दिवस तेथील ‘ प्रसाद जोशी ‘ गुरूजींनी मला म्हटलं अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने पोथीचं वाचन व्हायला हवं. आपण महाराजांमधे रंगून जायला हवंतेव्हा प्रार्थना त्यांच्या पर्यंत पोहोचते. जसं महाराज जेव्हा शेगांवच्या मंडळींना म्हणतात ‘ आमचा कृष्णा पाटील गेला  आता आम्हाला चिकण सुपारी कोण देतो?’ तेव्हा मनापासून वाटायला हवं की महाराज मी देऊ करीन सुपारी पण तुम्ही आमच्या जवळ रहा. भाऊ कवरांनी जेवणाचं आमंत्रण दिलं तसं कळवळून आपण प्रसादासाठी महाराजांना बोलवायला हवं. गुरूजींचं ते म्हणणं माझ्या मनाला भिडलंमी जास्त मनापासून पोथी वाचन सुरू केलं.

काहीच दिवसात शमा आणि जावई यांना पुण्याला येण्याचा योग येऊन ते पुण्यात त्यांच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. एकदा पोथीत बायजा बाईचा प्रसंग वाचताना डोळे भरून महाराजांना म्हटलं ‘ बायजाच्या नशिबात संसार नव्हता तेव्हा तुम्ही तसं सरळ सांगितलं. माझ्या मुलीच्या नशिबात अपत्य नसेल तर तसं सांगा तिकडच्यांनी दिलेली मुदत आता संपत येणार. जर तिला अपत्य झालं तर मी नातवंडाच्या वजना इतकी तुमची चांदीची मूर्ती घडवून तिची पूजा करेन! माझ्या भावपूर्ण वाचनाला एक दिवस जोशी गुरूजींनी आशिर्वाद दिलाजा तुझं काम झालं! त्या शब्दांनी मला अधिकच धीर आला.

माझ्याकडे गेली अनेक वर्ष झालीत ,दर पंधरा ऑगस्टला घरी सत्यनारायण व नातेवाईकांना जेवण असा कार्यक्रम असतो. पंधरा ऑगस्ट २००२ ची गोष्टसकाळी मी गजानन महाराजांना खूप कळवळून प्रार्थना केली. ‘महाराज माझ्या शमाचा काही तरी निर्णय लावा. माझ्या हाकेला धावा. मला तेव्हा गलबलून आलंआवाज रडवेला झाला. मी काही वेळ तशीच बसून राहिले.

या ग्रंथी ज्याचा भाव
या ग्रंथी ज्याचा भाव

पूजा पूर्ण झाली .लोक येऊ लागले. जेवणाची वेळ झाली. जेवणं जवळपास आटोपत आलीटळटळीत दुपार होतीएक याचक दाराशी उभा राहिलाम्हणाला माई जेवायला वाढ!आज तुझ्याकडे जेवायला आलो आहे. त्याला जेवायला वाढलंत्यानं पान पूर्ण स्वच्छ केलं. म्हणाला पांघरूण घाल मग मी निघतो. घरातील एक परीट घडीची चादर त्याला देऊ केली. जाताना त्या याचकाने आशिर्वाद दिला. चिंता करू नकोस माई सर्व ठीक होईल. गजानन महाराज सर्व ठीक करतील!

कार्यक्रम आटोपलासंध्याकाळ झाली. आता शमा आणि जावई मुंबईला शिफ्ट झाले होते. संध्याकाळी उशीरा फोन खणखणला. मुंबईहून फोन होता. शमाची टेस्ट पाॅझिटिव्ह आली होती. मी फोन ठेवलाडोळ्यात आनंदाश्रू येऊन याचकाचा आशिर्वाद आठवला आणि माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. याचक तो की मीयाचना तर मी केली होती.

२३ मार्च २००३ ला शमाला पुत्ररत्न प्राप्ती झाली. मला नातू झाला. आज अभ्यासात त्याने भरपूर प्रगती केली आहे. गजानन महाराजांनी माझे बालीश बोल ऐकलेत. पुढे मनाच्या विमनस्क अवस्थेतील याचना ऐकली. आयुष्यात त्यांनी भरभरुन दिलं. आता एकच इच्छा आहेजी मी त्या घडवून घेतलेल्या चांदीच्या मूर्ती समोर नेहमी व्यक्त करते. ती म्हणजे अध्यात्मिक साहित्यात वाचल्या प्रमाणेआता भक्ती परिपक्व व्हावी व काही मागण्याची इच्छाच नसावी. असावे ते फक्त त्यांचे अनुसंधान आणि त्यासाठी यायला हवं मुखी नाम!

श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!

अनुभव– प्रा. सौ.सीमा तेरेदेसाई   पुणे शब्दांकन– जयंत वेलणकर
गजानन भजन 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *