एक सत्य अनुभूती …श्री गजानन महाराजांच्या कृपेची……

जय गजानन …..एक सत्य अनुभूती


आज दिनांक  २७/ रविवारी मी शेगावला  जाण्यास  निघालो. बस  होती  नागपूर ते   शेगाव प्रवासी  १११२  असतील. लहान मुल, स्त्रिया अन  पुरुष गणपती   विसर्जनाचा  दिवस असल्यामुळे गर्दी  तुरळक होती.अकोला सोडल्यानंतर  रिधोया पुढे  आणि  व्याळा गावाच्या  अगोदर  काही कळण्याच्या  आतच गाडी सरपटत रस्त्याच्या  बाजूला   खड्ड्यात उलटी झाली. चाके वर काहीतरी विपरीत घडतेय ह्याची जाणीव मला झाली,आणि ताबडतोब  श्री गजानन बाबांचा धावा सुरु झाला जीवनात  प्रथमच अपघात होत असतांना  आणि त्या अपघाताचे  आपण साक्षीदार  होत असतांना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्री बाबांचे स्मरण होणे ह्या अतर्क्य गोष्टी  न्याहाळताना  मनाची घालमेल सरपटत गाडी  जातांना  स्त्रीमुले  ह्यांच्या किंकाळ्या ( त्या अजूनही माझ्या कानात गुंजत आहेत ) भेदरन्यास  भाग पाडत होत्या  माणसांना सर्वांना धीर देण्याचा  माझा  प्रयत्न अपघात घडल्याबरोबर  मिनिटांनी  लोक  जमा झाले गणपती विसर्जनासाठी  जाणारे  गणेश मंडळ, गजानन नगर गल्ली नंबर  किवा  इतर  असू शकते ) मधील लहान लहान  तसेच तरुण मंडळींनी  बराच धीर दिला खिडकीतून  बाहेर  पडल्यानंतर मात्र  माझा धीर खचला थोडासा भांबावलो  पलटलेल्या  बसकडे  पाहतांना  तो भूतकाळ आठवला. श्री बाबांचे स्मरण आठवले सर्व  प्रवासी  दुसया  बसने शेगावकडे  निघून गेले अवघ्या  १५२० मिनिटात  सर्व  घडले चालक  आणि  वाहक (वंजारी बाई) अकोल्याकडे  गेले. नंतर  बघ्यांची गर्दी  सुरु झाली मी  नंतर  ऑटोमध्ये बसून व्याल्याला  उतरलो तेथे माझे  मित्र श्री मनोहर बचाटे राहतात. त्यांना सर्व हकीकत  सांगितली तेसुद्धा  श्री बाबांचे  भक्त आहेत. दर गुरुवारी त्यांची  शेगाववारी  असते शरबत घेऊन नंतर मी माझे मित्र  श्री सुनीलभाऊ गायगोळ ह्यांना  घेऊन (दुचाकीवर) निमकरदा  मार्गे शेगावला  निघालो.

शेगावी-बाबांच्या-मंदिर-प्रांगण

एक सत्य अनुभूती
एक सत्य अनुभूती 

शेगावी-बाबांच्या-मंदिरप्रांगणात- प्रवेश केल्याबरोबर हृदय गलबलले मनात म्हटले, बाबा तुमच्या कृपेमुळेच मंदिर दिसले.आत दर्शन घेतांना पुन्हा पापण्या चिंब झाल्यात काय कसे किती  वर्णवू श्रीमाउलीची करुणा-कृपा-दयाश्रीबाबांना धन्यवाद देत परतलो.


आता मन स्थिर झाल्यावर लिहित आहे काही काळ तोच प्रसंग मनावर घाव घालत होता पण श्रीबाबांची ही जिवंत अनुभूति तुम्हाला सांगण्याची प्रबळ इच्छा मी रोखू शकलो नाही बाबांचे अनेक उपकार माझ्यावर   
आहेत पण आजचे उपकार अविस्मरणीय आहे.मला आणखी एकप्रश्न सतावत आहे जर आज गणेशविसर्जन नसते तरति मुले आली नसती मग?
श्री गजाननमहारांजाची कृपा नसती तर?

श्री गजाननमहाराज

श्री गजाननमहाराज  आणि श्री गजानन (गणपतीबाप्पा ) ह्यांच्या चरणी साष्टांग नंमन  तसेच  श्री गणेश मंडळ  गजानन नगर  गल्ली नंबर   मधील त्या लहान ते मोठ्या  तरुण मंडळीस  धन्यवाद  देऊन  विराम देतो.

जय गजानन.जय गणेश

उमेशसंतोषी
दि.२७//२०१५


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *